पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आपल्या अभिभाषणादरम्यान मिलेनिया यांचे आभार व्यक्त केले. फर्स्ट लेडी मिलेनिया ट्रम्प (Milenia Trump) यांचं इथे असणं सम्मानपुर्ण आहे. अशी भावना व्यक्त केली. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump India Visit) आजपासून २ दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. त्यांच्यासोबत अमेरिकेच्य़ा फर्स्ट लेडी मिलेनिया, मुलगी इवांका आणि जावई जॅरेड कुशनर हेदेखील आले आहेत.
“हेल्दी आणि हॅप्पी अमेरीकासाठी आपण जे प्रयत्न केलत त्यांचे चांगले परिणाम मिळत आहेत. समाजातील मुलांसाठी आपण जे करत आहात ते प्रशंसनीय आहे.”असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. मिलेनिया या दौऱ्यात देशातील ताजमहाल या जगप्रसिद्ध वास्तूला भेट देणार आहेत.
फर्स्ट लेडी मेलानिया ट्रंप का यहां होना सम्मान की बात है।
Healthy और Happy America के लिए आपने जो किया है, उसके अच्छे परिणाम मिल रहे हैं।
समाज में बच्चों के लिए आप जो कर रही हैं, वो प्रशंसनीय है: पीएम मोदी #NamasteTrump
— BJP (@BJP4India) February 24, 2020