देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढतो आहे. विषाणूचा फैलाव थांबवण्यासाठी देशभरात लॉकडाऊन ३ मे पर्यंत कायम करण्यात आल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. लॉकडाऊनचे नियम उद्या सांगितले जाणार असून या दुसऱ्या टप्प्यात अधिक कडक निर्बंध लादले जाण्याची शक्यता आहे.
कोरोनाला पराभूत करण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी सात उपाय सांगितले असून या सप्त पदीचे पालन केल्यास आपण नक्कीच कोरोनाचा पराभव करु असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय.
पाहुयात पंतप्रधान नरेंद्र मोदींची सप्तपदी काय आहे?
१ आपल्या घरातील वयस्क व्यक्तींची विशेष काळजी घ्या. खासकरुन अशी व्यक्तींची ज्यांना जुना आजार असेल त्यांची अधिक काळजी घेणं आणि कोरोनापासून संरक्षण करणं गरजेचं आहे.
२ लॉकडाऊन आणि #SocialDistancing ची लक्ष्मण रेषेचं पुर्ण पालन करा. घरात बनवलेल्या फेसकवर किंवा मास्कचा निश्चित वापर करा.
३ आपली प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आयुष मंत्रालयाद्वारे दिलेल्या सूचनांचं पालन करा. गरम पाणी, काढा यांचं सतत सेवन करा.
४ कोरोनाचा विषाणूचा फैलाव रोखण्यात सहाय्य करण्यासाठी आरोग्य सेतू App डाऊनलोड करा. इतरांनाही हा एप डाऊनलोड करण्यासाठी प्रेरित करा.
५ शक्य तितक्या गरिब कुटुंबांची काळजी घ्या. त्यांच्या जेवणाच्या गरजा पुर्ण करा.
६ तुम्ही आपल्या व्यवसाय, उद्योगात सोबत काम करणाऱ्या लोंकांप्रति संवेदना ठेवत कोणाला नोकरीवरुन काढू नका.
७ देशातील कोरोना योद्धा, आपले डॉक्टर- नर्सेस, सफाई कर्मचारी, पोलिस कर्मचारी यांचा सन्मान करा.