नायर रुग्णालयातील डॉ. पायल तडवी आत्महत्याप्रकरणी अटक करण्यात आलेले आरोपी डॉ. हेमा आहुजा,डॉ,भक्ती मेहेर आणि डॉ. अंकिता खंडेलवाल यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. याआधी आरोपींच्या विरुद्ध चार्जशीट दाखल करण्यात आली होती. त्यामुळे आरोपीना जामीन देण्याचा आमचा नकार नाही असं राज्य सरकारने स्पष्ट करताच न्यायमूर्ती साधना जाधव प्रत्येकी दोन लाखांच्या हमीपत्रावर जामीन मंजुर केला. त्याचबरोबर हा खटला सुरु असेपर्यंत डॉक्टरांचे वैधकीय परवाने स्थगित करण्याचे आदेश न्यायमूर्तीने दिले होते. ७२ दिवसानंतर या डॉक्टरांची सुटका होणार आहे. या तीनही डॉक्टरांनी आपल्या सुटकेसाठी हायकोर्टात अर्ज केला होता. दरम्यान सत्र न्यायालयाच्या परवानगीशिवाय तीनही आरोपीना शहराच्याबाहेर अथवा नायर रुग्णालयाच्या आवारात न जाण्याची ताकीद दिली आहे.