‘हे कामगार आक्रमक झाले तर प्रशासनालाही अवघड जाईल’, पंकजा मुंडेंची सुचना

Update: 2020-04-02 12:09 GMT

भिगवण आणि खेडमधील ऊसतोड कामगारांना पोलिसांकडून झालेल्या मारहाणीबद्दल असंतोष व्यक्त करत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी ऊसतोड कामगारांच्या अडचणींवर लक्ष घालावे अशी विनंती भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी केली आहे. २१ days lock down मध्ये नागरिकांनी घरात राहावे म्हणून पोलिसांकडून नागरिकांना लाठीचा प्रसाद देणारे अनेक व्हिडीओ आपण पाहत आहोत.

याविषयी पंकजा मुंडे यांनी “भिगवण आणि खेड येथील ऊसतोड कामगारांना मारहाण झाली. मी पोलिस कर्मचाऱ्यांना आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना सॅल्यूट करतो मात्र हे काही रस्त्यावरचे फिरणारे तरुण नाहीत जे कर्फ्यू लागल्यावर रस्त्यावर काय चाललय ते पाहायला आले येतात. हे काम करणारे कष्ट करणारे गरिब लेक आहेत. जे स्वत:च्या घरापासून कोसो दूर आहेत. सगळं लॉक आऊट असताना साखर कारखाने चालू आहेत ह कुठला अन्याय आहे. कुठल्याही माणसाला स्वत:च आरोग्य धोक्यात न घालण्यासाठी ज्या उपायोजना केल्या पाहिजेत त्या करण्याचा अधिकार आहे. कोणताही कामगाराकडून आताच्या परिस्थितीत काम करुन घेणं अयोग्य आहे.” अशी भावना व्यक्त केली आहे.

सरकारच्या प्रत्येक निर्देशाचं पालन करणं आवश्यक आहे पण माझी सरकारलाही विनंती आहे. पोलिसांनी ऊसतोड कामरागांना केलेल्या मारहाणीबद्दल नापसंती व्यक्त करताना या प्रकरणाचा तात्काळ निर्णय झाला पाहिजे नाहीतर हे कामगार आक्रमक झाले तर प्रशासनालाही अवघड जाईल अशी सूचना केली आहे. ऊसतोड कामगारांना या प्रकरणावर संयमाने व्यक्त व्हावं यावर आपण नक्कीच मार्ग काढू असं आवाहन त्यांनी केलंय.

https://www.facebook.com/MaxWoman.in/videos/2568956433354581/?t=0

 

Similar News