गोपीनाथ मुंडेंचा शब्द त्यांच्या लेकीने पाळला

Update: 2019-09-18 14:08 GMT

दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांना ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला होता. त्यानंतर आता ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी या बाबीचा पाठपुरवठा करून, ऊसतोड महामंडळ लवकरात लवकर सुरू व्हावी. म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली. आणि अखेर ऊसतोड महामंडळाची स्थापना झाली. याची घोषणा पंकजा मुंडे यांनी एका कार्यक्रमादरम्यान केली.

राज्य सरकारने दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने या ऊसतोड महामंडळाची निर्मीती करण्याचा आदेश दिला आहे. या महामंडळाच्या अध्यक्षपदी माजी आमदार केशवराव आंधळे यांची नियूक्ती करण्यात आली आहे. मुंडे यांनी ऊसतोड मजूरांच्या भावनेचा आणि जिव्हाळ्याच्या विषयाला अखेर न्याय मिळवून दिला आहे.

सुरवातीला महामंडळाऐवजी ऊसतोड कामगार योजना स्थापन करण्याचे योजले होते. परंतू पंकजा मुंडे यांच्या आग्रहाखातर सरकारने महामंडळाची स्थापना केली आहे.

Similar News