धनंजय मुंंडेंकडून छत्रपतींच्या संस्कारांची पायमल्ली; पंकजा मुंडेंचा निशाणा

Update: 2020-02-19 08:45 GMT

परळीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी व्यापाऱ्याला मारहाण केली असल्याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे. याविरोधात व्यापारी संघटनेकडूनही परळीत बंद पाळण्यात आला आहे. यावर पंकजा मुंडे यांनी "शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात परळी येथे व्यापारी आणि सामान्य जनतेवर अन्याय जनतेने केलेलं बंद ही परिस्थिती तर छत्रपतींच्या संस्कारांची पायमल्ली..सर्वत्र खेद आणि तीव्र संताप व्यक्त होत आहे.." असं ट्वीट करत खेद व्यक्त केलाय.

"परळीत गुंडागर्दी, हफ्तेखोरी ,माफियाराज करायचं आणि पोलिसांनी कर्तव्य बजावल्यावर ,गुन्हे दाखल झाल्यावर मग ‘गय करणार नाही ‘अशी भाषा करायची हे दुटप्पी धोरण.. गुंडांचं आत्मबल वाढवणारं पालकत्व आमच्या बीडला मिळालं हे दुर्दैव.. हे खपवून घेतलं जाणार नाही." असा इशारा देत पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे. परळीमध्ये व्यापारी अमर देशमुख यांना मारहाण करण्यात आली होती. प्रोपर्टी वादातुन हा सर्व प्रकार झाल्याचं बोललं जात आहे.

परळीत व्यापारी अमर देशमुख यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचे सांगितले जात आहे. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते गणेश कराड आणि अमर देशमुख यांच्यामध्ये संपत्तीवरुन वाद सुरु होता. या वादाचे रुपांतर हाणामारीमध्ये झाले. यामधूनच कराड यांच्या सहकाऱ्यांनी देशमुख यांना मारहाण केल्याचे सांगितले जात आहे.

Similar News