मागील अनेक वर्षांपासून धनगर समाजाच्या आरक्षणाची मागणी प्रलंबित आहे. आरक्षणासाठी धनगर संघर्ष समिती आक्रमक झाली असून आज जिल्हाधिकारी कार्यालयात धडक दिली. येळकोट येळकोट जय मल्हारचा घोषात हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यलयासमोर दाखल झाला.
“दऱ्या –खोऱ्यांत राहणारा धनगर समाज हलाखीच्या परिस्थितीत जगत आहे. राज्यात तात्काळ एसटी प्रवर्गात आरक्षण लागू करण्यात यावे. अर्थसंकल्पमध्ये धनगर जमातीसाठी केलेल्या एक हजार कोटी रुपयांच्या निधीची अंमलबजावणी करण्यात यावी. मेंढपाळ चराईचा प्रश्न निकाली काढावा.” अशी मागणी धनगर समाजाच्यावतीने करण्यात आली असून मागण्या पुर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा धनगर समाजाच्या वतीने देण्यात आला आहे.