सरकार मायबाप पूल दुर्घटनेत ज्यांचा जीव गेला ते कुणाच्या हद्दीतले?

Update: 2019-03-15 10:46 GMT

सीएसएमटी येथील पादचारी पूल कोसळला... अनेक जण गंभीर जखमी तर ६ जण मृत्यूमुखी पडले.या दुर्घटनेनंतर नागरिकांची तारांबळ झाली तर मीडियावाले येणाऱ्या राजकर्त्यांचे बाईट घेण्यात व्यस्त होते. यात नागरिकांशी मीडियावाल्यांनी बोलण्याचा प्रयत्न केला मात्र काही जणांनी प्रशासनाला जबाबदार ठरवलं तर काही जण जखमींना रुग्णालयात पोहचवण्याची व्यवस्था करत होते. अशातच एक बाब प्रकर्षाने जाणवली आणि ती नेहमी कुठलाही पूल पडला की जाणवते... मुंबईचे महापौर म्हणत होते की ह्या पुलाची जबाबदारी महापालिकेकडे नाही तर रेल्वे प्रशासन म्हणत होतं की हा पूल आमच्या हद्दीत नाही. नेहमी सारखं एकमेंकांवर जबाबदाऱ्या झटकून हे राजकार्ते स्वतःला सेफ करत होते. मात्र हे जर तुमच्या हद्दीत नाही तर मग आम्ही जनता कुणाच्या हद्दीत आहोत असा सवाल काही महिला प्रवाश्यांनी केला आहे. या दुर्घटनेत ३ महिलांचा जीव गेला... या दुर्घटनेमुळे पुन्हा एकदा राज्यातील धोकादायक पुलांचा प्रश्न ऐरणीवर आला... या संदर्भात आमचे प्रतिनिधी किरण सोनावणे यांनी महिला प्रवाश्यांशी बातचीत केली आहे... महिलांना कोणत्या अडचणींना सामोरं जावं लागतं पाहा हा व्हिडिओ...

https://www.facebook.com/MaxMaharashtra/videos/2105284912926434/

Similar News