महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महिला आमदारांनी विक्रम केला होता . महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीत 288 जागांपैकी 24 महिला उमेदवारांचा विजय झाला होता. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधील देवळाली मतदारसंघ- सरोज अहिरे (राष्ट्रवादी काँग्रेस) तासगाव मतदारसंघ- सुमनताई पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस) श्रीवर्धन मतदारसंघ- आदिती तटकरे (राष्ट्रवादी काँग्रेस) या तीन महिला विजयी झाल्या होत्या. त्याचबरोबर अपक्ष 2 महिला आमदारांचा यामध्ये समावेश होता.
मात्र जर आजच्या राजकीय घडामोडीत कुठेही महिला नेत्या अजित पवारांसोबत दिसत नाही. राज्यात शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांचं सरकार येणार असं वाटत असतानाच भाजपनं आज अचानक मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रिपदाचा शपथविधी घडवून आणला. त्यामुळं राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली. अनेक महिला नेत्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या. यामध्ये किती आमदार अजित पवारांसोबत आहेत यावर प्रश्नचिन्हं आहे. मात्र यामध्ये एक वेगळेपण म्हणजे राष्ट्रवादीतील एकही महिला अजित पवारांसोबत गेली नाही. दरम्यान चित्र वाघ यांनी आपल्या ट्विट हॅण्डल वरून ट्विट केलं की दादांनी योग्यवेळी योग्य निर्णय केला असा ट्विट त्यांनी आज केला.