अ नो मिन्स नो ही जगभरात गाजलेली कँपेन. मराठीत बोलायचं तर नाही म्हणजे नाही, नकाराचा दुसरा अर्थ नसतो. संबंधांमध्ये संमती आवश्यक आहे, आणि या संमतीचा आदर ठेवायला पाहिजे अशी ही कँपेन आहे. या कँपेनच्या अनुषंगाने मुंबई पोलिसांनी एक व्हिडीयो पोस्ट केला आहे. पक्षी ही संमतीची भाषा समजू शकतात तर माणसं का समजून घेत नाहीत असा संदेश या व्हिडीयोतून देण्यात आला आहे.
https://twitter.com/mumbaipolice/status/1112212212389740544?s=12