देशभरात लग्नसोहळ्याची धूम म्हटलं की डोळ्यासमोर येते अंबानी कुटुंबियातील मुलांची लग्नं... नुकतेच नीता आणि मुकेश अंबानीच्या मुलीचे लग्न मोठ्या थाटामाटात करण्यात आलं असून आता मुलगा आकाशचं लग्नही पार पाडण्यात आलं आहे.. ते म्हणजे एका आगळ्या-वेगळ्या पद्धतीने नीता अंबानींने आपल्या सुनेचं म्हणजे श्लोकाचे स्वागत केलं देशाच्या संरक्षकांसोबत केलं आहे.
आकाश आणि श्लोकाच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये अंबानी कुटुंबियांनी देशाचे संरक्षण करणाऱ्या सैनिक, नेवी, पैरामिलिट्री फोर्सेज, मुंबई पोलीस, रेल्वे संरक्षक दलाच्या हजारो जवान आणि त्यांच्या कुटुंबियांना आमंत्रित करुन हा सोहळा सेलिब्रेट केला तसेच नवीन जोडप्याला त्यांचा आर्शिवाद ही मिळाला. यावेळी जियो वर्ल्ड सेंटरमध्ये धीरू भाई अंबानी स्कवायर वर म्युजिकली फाऊंटेन आणि डान्स शो चेही आयोजन केलं होतं.
हा सोहळा शहर आणि राष्ट्राला सुरक्षित करणाऱ्या सैन्य कर्मचाऱ्यांच्या प्रति आभार सन्मान म्हणून साजरा करण्यात आला.
यावेळी नीता अंबानी यांनी म्हटलं की आम्ही एका कुटुंबाच्या रुपात आपल्या शहराला बघतो तसेच सगळ्यांचा आम्ही सन्मान आणि आभार व्यक्त करतो. जे या शहराचे संरक्षण करतात विशेष करुन आपली पोलीस, सैन्य दल आणि सीटी वर्कर्सचे संचालनात विशेष योगदान आहे. तसेच आपला आनंद संपूर्ण शहरासोबत साजरा करण्याचे आम्हाला भाग्य लाभले. त्यासाठी मी सर्वांची आभारी आहे. हा कार्यक्रम मुंबईच्या बीकेसीमधल्या धीरुभाई अंबानी स्क्वायर मध्ये आयोजित केला होता.