आज दिल्ली च्या निर्भया केसमधील 4 ही दोषींना अखेर फासावर लटकवण्यात आलं. सात वर्षांपूर्वी 16 डिसेंबर 2012 ला दिल्लीतील 23 वर्षाच्या पॅरामेडिकल विद्यार्थिनीवर 4 नराधमांनी सामूहिक बलात्कार केला होता. चित्रपट पाहून आल्यानंतर मित्रासोबत बसमधून मुनिरकाहून द्वारकाला जात असताना तिच्यावर अनन्वित अत्याचार करुन तिला धावत्या बसमधूनच रस्त्यावर फेकलं होतं. आज या चारही दोषींना फासावर लटकवण्यात आलं.
आज पहाटे ठीक 5:30 वाजता या नराधमांना फासावर लटकवण्यात आल्यानंतर निर्भया ची कायदेशीर लढाई लढणाऱ्या वकील सीमा कुशवाह यांनी कशा प्रकारे निर्भयाची केस कशी लढली. आणि दोषींना कसं फासावर लटकवलं याची माहिती दिली.
निर्भया ने जे दु:ख सहन केलं ते दु:ख आपण सहन करु शकत नाही. मात्र, तिच्या त्रासाची जाणीव मला आहे. तिला किती त्रास झाला असेल? त्या दु:खा पुढे ही फाशीची शिक्षा काहीच नाही. आम्ही निर्भया ला वाचवू शकलो नाही. मात्र, तिला न्याय देवू शकलो. या चारही दोषींना फाशी देण्यात आली आहे. त्यांनी जे कृत्य केलं. त्यांना त्याची सजा मिळाली.
या लढाईत आम्ही मोठ्या ताकतीने लढलो. मला काहीच अशक्य वाटत नाही. मी एका छोट्या गावातून आली आहे. ज्या गावात मुलींना शिकवलं जात नाही. त्यामुळं मला ही केस लढताना अशक्य वाटलं नाही. निर्भया सोबत इतक्या घाणेरड्या पद्धतीने अत्याचार करण्यात आला. हे तिने कसं सहन केलं असेल. म्हणून मी निर्णय घेतला. हा समाज, हा देश, सिस्टम म्हणून मी या देशाचे नागरिक म्हणून… मी निर्भया च्या आईसोबत ही लढाई लढली. आणि न्याय मिळाला.
ही केस तशी सोपी नव्हती. जेव्हा मी निर्भया च्या आई शी जोडली गेली. एखादी घटना घडल्यानंतर मला कळालं लोक प्रतिक्रिया देतात. सिस्टम देखील प्रतिक्रिया देते. मात्र, त्यानंतर सगळं शांत होतं. निष्क्रिय होतं. यामुळे 7 वर्ष लागतात.
मी दावा करते. जेव्हा हा खटला सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित होता. तेव्हा मी जर पुढाकार घेतला नसता तर आजही हा खटला सर्वोच्च न्यायालयात प्रलंबितच राहिला असता. जर मी या केसला फास्ट कोर्टात नेलं नसतं तर… आजही हा खटला प्रलंबितच पडला असता.
त्यामुळे एक समाधान आहे की, आम्ही या सिस्टम ला मजबूर केलं. जर कायदा आहे. तरतूद आहे… तर तो आमलात आणला च पाहिजे. यासाठी आम्ही प्रयत्न केले. सिस्टीमला ठणकावून सांगितलं. फाशी शिक्षेबाबत असं बोललं जात होतं की, खूप साऱ्या खटल्यात फाशी ची शिक्षा टाळली गेली आहे. अंमलबजावणी केली गेली नाही. तात्काळ अंमलबजावणी करण्याऐवजी 10 ते 15 वर्ष उशीर केला. आणि नंतर त्याचंच भांडवलं करुन फाशी टाळली. मी मात्र, याच्या शेवटापर्यंत गेले. आणि न्याय मिळवला.
माझी मुलींसाठीची ही लढाई सुरु राहील. जोपर्यंत माझा जीव आहे. तोपर्यंत लढत राहणार. जोपर्यंत जीवन आहे. तोपर्यंत लढत राहणार. निर्भयाला न्याय दिला आहे. माझ्या कडं अजून काही माझ्या मुली आहे. त्यांच्यावरही अन्याय झाला आहे.
परिवारामध्ये, समाजामध्ये जर तुमच्या हक्काची लढाई लढायची असेल तर लढा. या देशावर आमचा ही बरोबरीचा हक्क आहे. मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरा. तरच आपण सुरक्षित राहू. नाही तर काही ठरावीक लोकांनी या रस्त्यावर कब्जा केला आहे. त्यामुळं अशा घटना घडत असतात.
अशी संतप्त वकील प्रतिक्रिया सीमा कुशवाह यांनी एका खाजगी वाहिनीला बोलताना दिली दिली आहे.
दरम्यान दिल्लीत ही घटना घडल्यानंतर तिच्यावर दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात उपचार सुरु असताना जनतेच्या मनात या घटनेबाबत मोठ्या आक्रोश होता. प्रकृतीत सुधारणा होत नसल्यानं तत्कालीन सरकारने तिला पुढील उपचारासाठी सिंगापूरच्या माऊंट एलिझाबेथ रुग्णालयात दाखल केलं होतं. मात्र, हे उपचार देखील शेवटी निष्फळ ठरले. 29 डिसेंबर ला उपचारा दरम्यान माऊंट एलिझाबेथ रुग्णालयात तिने अखेरचा श्वास घेतला होता.