दिल्ली सामुहिक बलात्कार (Delhi Gang Rape) प्रकरणात दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने आज सर्व आरोपींना फासावर लटकविण्याचा नवीन डेथ वॉरंट जारी करण्याचा महत्त्वपुर्ण निर्णय घेतला आहे. या नवीन डेथ वॉरंटनुसार सर्व आरोपींना ३ मार्च रोजी सकाळी ६ वाजता फाशीची शिक्षा दिली जाणार आहे. आरोपी पवन गुप्ताकडे शिक्षेसंदर्भात पुनर्विचार याचिका दाखल करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. इतर तीन आरोपींची पुनर्विचार याचिका यापुर्वी फेटाळण्यात आली असुन तिसऱ्यांदा सर्व आरोपींविराधात फाशीचा वॉरंट जारी करण्यात आला आहेत.
न्यायालयाने आरोपींच्या फाशीची नवीन तारिख जाहिर केल्यानंतर पीडितेच्या आईने आशा आहे की, “यावेळी आरोपींना नक्की फाशी होईल, मी अजुनही हार मानली नाही.” अशी भावना व्यक्त केली आहे.