Nirbhaya Case : निर्भयाचे गुन्हेगार फासावर लटकल्याने कायद्याचा सन्मान राखला गेला - सुप्रिया सुळे
आज निर्भयाचे गुन्हेगार अखेर फासावर लटकले.कायद्याचा सन्मान राखला गेला अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी निर्भयाला मिळालेल्या न्यायावर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
कायद्याचे राज्य आहे... महिलांवर अत्याचार करणाऱ्यांची गय केली जाणार नाही हा संदेश देणारी ही घटना आहे असेही खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.
या आरोपींची फाशी असे गुन्हे करणाऱ्या मानसिकतेला सणसणीत चपराक आहे असे स्पष्ट करतानाच खासदार सुप्रिया सुळे यांनी निर्भयाला श्रद्धांजली वाहिली आहे.