निर्भया सामुहिक बलात्कार प्रकरणी चार दोषींना २२ जानेवारीला सकाळी ७ वाजता फासावर चढवलं जाणार आहे.दिल्लीच्या पाटीयाला हाउस कोर्टांना हा निर्णय दिलाय. चारही दोषींविरोधात डेथ वॉरंट जारी केलं आहे. त्याचबरोबर निर्भया बलात्कार प्रकरणातील आरोपी मुकेश, विनय शर्मा, अक्षय कुमार सिंह व पवन गुप्ता यांना कोर्टानं यापूर्वीच फाशीची शिक्षा सुनावलेली आहे. मात्र आज त्यांच्या डेथ वॉरंटवर कोर्टात सुनावणी झाली. दरम्यान यावर महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा डॉ. विजया रहाटकर यांनी यावर प्रतिक्रिया दिली असता "ज्या दिवशी ठरलंय त्या दिवशी हे पूर्नत्वाला जाईल आणि निर्भया बलात्कार प्रकरणातील आरोपींना फाशी दिली जाईल त्याचबरोबर हे न्यायाच्या दिशेनं टाकलेलं पाऊल आहे" असं डॉ. विजया रहाटकर म्हणाल्या.
https://youtu.be/b8-vWIR3CxI