निर्भया बलात्कार प्रकरण; ‘तारीख पे तारीख’ दुसऱ्यांदा फाशी टळली

Update: 2020-01-31 16:28 GMT

निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणात चार आरोपींची फाशी दुसऱ्यांदा टळली आहे. पाटीयाला हाऊस कोर्टानं पुढच्या आदेशापर्यंत फाशी थांबवली आहे. कोर्टानं अक्षय, विनय, पवन आणि मुकेश या चारही आरोपींचे डेथ वाँरटही रद्द केले आहेत.

या चारपैकी तीन आरोपींना एक फेब्रुवारीला फाशी दिली जावू शकतो असा युक्तिवाद तिहार कारागृह प्रशासनाच्या वतीनं कोर्टात करण्यात आला. आरोपींचे वकील एपी सिंह यांनी तीन आरोपीची याचिका प्रलंबित असल्यामुळे एका आरोपीला फाशी देने बेकायदेशीर ठरेल असा युक्तिवाद कोर्टापुढं केला.

दूसरिकडे निर्भयाच्या आईच्या वकीलांनी आरोपी फाशीची शिक्षा टाळण्यासाठी वेगवेगळ्या खेळी खेळत असल्याचा आरोप केलाय.

यापुर्वी कोर्टानं ७ जानेवारीला या आरोपीविरुध्द डेथ वाँरट जारी केला होता. त्यानंतर १७ जानेवारीला दुसरा डेथ वाँरट बजावला होता.

चार आरोपींपैकी विनय याच्या दयेचा अर्ज राष्ट्रपतीकडे पोहोचला आहे. तर आरोपी अक्षय आणि पवन याचा राष्ट्रपतीकडे दयेचा अर्ज प्रलंबित आहेत. यापुर्वी आरोपी पवन याचा अल्पवयीन असल्याचा दावा सुप्रीम कोर्टानं फेटाळला होता.

Similar News