Nirbhaya Case: दोषींना ७ दिवसांची मुदत, एकत्रच होणार फाशी

Update: 2020-02-05 12:31 GMT

निर्भया बलात्कार प्रकरणातील आरोपींना फाशी केव्हा होणार? असा सवाल आता देशात विचारला जात आहे. आरोपींना आत्तापर्यंत दोन वेळा कायद्याचा आधार घेत डेथ वॉरंन्ट रद्द केलं आहे. मात्र, आज दिल्ली उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत न्यायालयाने सर्व दोषींना एकाच दिवशी फाशी होईल असा निर्णय दिला आहे. २०१७ मध्ये याचिका फेटाळल्यानंतरही डेथ वॉरन्ट जारी करण्यात आले नाही, आणि त्यावर कुणी आक्षेपही घेतला नाही असे निरीक्षणही कोर्टाने नोंदवले आहे.

आज केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांनी दिल्ली उच्च न्यायालयात आरोपीला तात्काळ शिक्षा व्हावी अशी मागणी करणारी याचिका दाखल केली होती. मात्र, न्यायालयाने ही याचिका फेटाळत. निर्भया प्रकरणातील सर्व दोषींना ७ दिवसांमध्ये सर्व कायदेशीर मार्ग तपासण्याची डेडलाइनही दिली आहे. त्यामुळे पुढील ७ दिवसानंतर दोषींना फाशी देण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

यावेळी न्यायालयाने दोषींना फाशी देण्यात होणाऱ्या होण्यात विलंब लागल्याच्या मुद्द्यावरून प्रशासनाला खडे बोल सुनावत नाराजी व्यक्त केली आहे. निर्भया प्रकरणातील आरोपींचा गुन्हा मोठा क्रुर असून याचा समाजावर मोठा प्रभाव पडल्याचं कोर्टाने म्हटले आहे.

काय आहे नियम?

न्यायाधीश सुरेश कैत यांनी जेल मॅन्युअलच्या नियम ८३४ आणि ८३६ नुसार, एकाच प्रकरणातील एकाहून अधिक शिक्षा ठोठावण्यात आलेल्या दोषींची याचिका प्रलंबित राहिली असेल, तर त्यांची फाशी टळते. असं सांगत एका आठवड्यात कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करा असे आदेश दिले आहेत.

घटनेच्या कलम २१ अंतर्गत असणाऱ्या उपकलमांचा दोषींनी पुरेपूर फायदा उठवला. या प्रकरणात दोषींना फार मोठा कालावधी घेत

Similar News