महिलांच्या प्रश्नांकडे बघण्याची नवी दृष्टी देणारं सशक्त माध्यम मॅक्सवुमन...
सध्या जगभरात हाहाकार माजलाय… मध्य युरोपात महाप्रलय, ऑस्ट्रेलियात वारंवार लागणारे वणवे… चीनमध्ये आलेला महापूर… महाराष्ट्रात आठवड्याभराचा मुसळधार पाऊस आणि पावसाने दुथडी भरून लोकवस्तीत शिरकाव करणाऱ्या नद्या…. एकंदरितच महापूराने काबाडकष्ट करून उभा केलेल्या संसाराची राखरांगोळी केली. एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं… सध्या जगभरातील महिला वर्ग पुरुषांच्या तुलनेत मोठ्याप्रमाणात संकटात आहे.
कोणतीही नैसर्गिक आपत्ती, मानवी संकट आलं तर त्याचा सर्वात प्रथम आणि मोठा फटका बसतो. तो म्हणजे महिला वर्गाला असे शब्द फक्त माध्यमांच्या पॅकेज स्टोरीज किंवा वृत्तपत्राच्या मथळ्याखाली आपण पाहतो. वाचतो किंवा अनेकदा बोलतो आणि बोलून सोडून देतो. कारण सुखाचा संसार आणि त्या संसारासाठी झटणाऱ्या महिलांच्या आयुष्यात हा दुखाचा कोसळलेला डोंगर… कधी स्वप्नातही त्यांनी विचार केला नसेल एकएक वस्तू जमा करून उभारलेल्या संसारावर असा महाप्रलय येईल…
सांगण्याचा मुद्दा असा की पूरग्रस्त परिस्थितीत मुख्यप्रवाहातील माध्यमं, फिल्डवर असणारे पत्रकार नेमक्या कशाप्रकारच्या बातम्या करतायेत किंवा कशाला सर्वाधिक कव्हरेज देतायत? किती राजकारणी आले त्यांनी काय टीका केली? याच्यात मग्न झालेल्या माध्यमांना समाजात महिलांना पुरवणी पानापुरती मर्यादित न ठेवता फ्रंटलाईन वर घेऊन येणाऱ्या मॅक्सवुमन वेबपोर्टलने महापूर कव्हरेजची दिशा बदलण्याचं धाडस (पूरग्रस्त भागातील महिलांच्या व्यथा…) चर्चासत्रात केलं.
अशा आपत्तीच्या परिस्थितीत नेमक्या उद्भवणाऱ्या महत्त्वाच्या प्रश्नांना(ज्यावर कुणी भाष्य करत नाही) हात घालत आहे. महिलांच्या अंर्तवस्त्रापासून ते सरकारचे धोरण, महिलांची सुरक्षा, स्तनदा मातांचे प्रश्न आणि महिला रक्षक दल याबाबत केलेल्या सविस्तर चर्चेत अनेक प्रश्नांची समाजापुढे उकल केल्याचं पाहायला मिळालं...
कायद्यानं वागा चळवळीचे सर्वेसर्वा आणि सामाजिक कार्यकर्ते राज असरोंडकर यांनी महिलांचे मुद्दे कशा पद्धतीने बाजूला केले जाते? यावर भाष्य करत नुकतेचं भास्कर जाधव यांनी महिलेला अरेरावी केल्याच्या बातम्या मोठ मोठ्या हेडलाईन खाली माध्यमांनी चालवल्या. परंतू ती महिलांना आकांताने ओरडून जे काही सांगते त्या मुद्द्याला सर्रास पद्धतीने बाजूला केले गेले.
महिलांचे प्रश्न किंवा महिलांना मिळणारं स्थान(पुरवणी) याला जबाबदार माध्यमं देखील आहे. या मताशी मी सहमत आहे. कारण माध्यमं समाजाचा आरसा आहेत. असं आपण म्हणतो… परंतू तिच माध्यमं झोपेचं सोंग आणून सोयीनुसार बातम्या करू लागले आहेत. खरंतर समाजातील प्रश्न विशेष करून महिला प्रश्नांकडे कसं बघावं? याची मुख्यप्रवाहातील माध्यमांनी नवी दृष्टी देणं गरजेचं आहे. मात्र, ते करताना ते दिसत नाही. म्हणून मॅक्सवूमन सारखी माध्यमं मुख्य प्रवाहातील माध्यमं जे काम करत नाही. ते आता ही माध्यमं करत आहेत.
मुख्य प्रवाहातील माध्यमांना महिलांच्या अंर्तवस्त्राचा मुद्दा महत्त्वाचा वाटत नाही. पूरजन्यपरिस्थिती पुरुष जीव वाचवण्यासाठी कोणत्याही कपड्यांवर घराबाहेर पडू शकतो. परंतू महिलेला अद्यापही विचार करावा लागतो… मी अमुक कपड्यावर बाहेर कशी पडू.. अशा प्रश्नांना राज असरोंडकर यांनी या कार्यक्रमात वाचा फोडली आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मुली, महिला यांच्या सुरक्षेचा… मॅक्सवुमनच्या संपादक प्रियदर्शनी हिंगे यांनी हा मुद्दा उपस्थितीत करत प्रशासनालाही सवाल केला.
समाजाच्या विकृत मानसिकतेला किंवा नजरेला आपत्ती, संकट कळत नाही. त्यांना फक्त महिलेचं शरीर दिसतं. कोव्हिडसारखा जीवघेण्या आजार ही या मानसिकतेपुढे हात टेकल्याचं चित्र गेल्यावर्षी अनेक कोविड सेंटर मध्ये पाहायला मिळाले.
मग अशा महापूर आलेल्या ठिकाणी अनेक जण आपआपला जीव वाचवण्याच्या खटपटीत असतो. त्यातही अशी विकृती उफाळून येऊ शकते. महिला मुली विशेष करून एकल महिला व त्यांच्या मुलींना कशा पद्धतीने सरकार सुरक्षा पोहोचवेल. अशा अनेक प्रश्नांवर झालेली चर्चा एकदा नक्की बघा… खालील लिंकवर क्लिक करा