पार्सल नको आता हॉटेल पुर्ण क्षमतेने उघडण्याची परवानगी द्या : सुप्रिया सुळे

Update: 2020-09-03 08:00 GMT

जिम, थिएटर सुरू केल्यानंतर रेस्टॉरंट व्यावसायिकांसाठी सुप्रिया सुळे यांनी पुढाकार घेतला आहे. कोरोना काळात रेस्टॉरंटस व्यावसायिकांना होणारा त्रास लक्षात घेता रेस्टॉरंटस व्यावसायिकांच्या बाबतीत सहानुभूतीपुर्वक विचार करुन सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी ट्विटरवरुन केली आहे.

हे ही वाचा...

पांडुरंगा तुझी कच्ची बच्ची मागे ठेऊन ‘डेड लाईन’च गाठलीस रे!!!

आकड्यांचा खेळ आणि गोंधळवणारे शब्द.. काकूंचा खरंच आकड्यांचा गोंधळ झाला का?

‘कावळा शिवला’ त्याची गोष्ट … !!

ब्रिटिश राजघराण्यातील बंडखोर ‘प्रिन्सेस डायना’

"कोरोनाच्या संकाटामुळे राज्यातील रेस्टॉरंटचा व्यवसाय अडचणीत सापडला आहे. सध्या पार्सल्सची मुभा देण्यात आली असली तरी यातून या उद्योगाला सावरण्यासाठी पुरेशी नाही. याशिवाय अनेक रेस्टॉरंटचालकांना मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे." असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

https://twitter.com/supriya_sule/status/1301347238640119809

या व्यावसायिकांना होणारा त्रास लक्षात घेता, रेस्टॉरंटस् सुरु होणे आवश्यक आहे.यासाठी आवश्यक असणारे सोशल डिस्टन्सिंग आदीचे आवश्यक दिशानिर्देश देखील जारी करावेत. आपणास विनंती आहे, की कृपया या व्यावसायिकांच्या बाबतीत सहानुभूतीपुर्वक विचार करुन सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मगणी सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे ट्विटरवरुन केली आहे.‘महाराष्ट्र रेस्टॉरंट क्लब’च्या वतीने काही मागण्या करण्यात आल्या आहेत. चे मुख्य समन्वयक वेदांशू पाटील यांनी सुप्रिया सुळे यांना लिहिलेले पत्रही त्यांनी सोबत जोडले आहे.

Similar News