‘शेतकऱ्यांचं मरण हेच सरकारचं धोरण’- दिपीका चव्हाण

Update: 2019-10-06 11:37 GMT

बालगणच्या राष्ट्रवादी पक्षाच्या आमदार दिपीका चव्हाण (NCP MLA Deepika Chavan) यांनी कांदा या प्रश्नावर पत्रकार परिषद घेतली. यादरम्यान ‘शेतकऱ्यांचं मरण हेच सरकारचं धोरण’ असं म्हणून सत्ताधारी पक्षावर कठोर शब्दात टीका केली आहे.

गेल्या काही वर्षांपासून कांद्याला समाधानकारक भाव न मिळाल्यानं कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत होते. यंदा कांद्याला (onion rate) तीन हजार रूपयांच्या आसपास भाव मिळू लागताच शासनाने निर्यात शुल्कात वाढ केली आहे. त्यात दुष्काळी परिस्थितीमुळे कांद्याचे उत्पादन कमी झाल्याने कांद्याचे भाव वाढलेत. यामुळे सरकारने थेट कांद्याच्या निर्यातीवर बंधन आणले आहे.

ऐन सणासुदीच्या तोंडावर सरकारनं शेतकऱ्यांच्या तोंडचा घास काढून घेतला आहे. राज्यातील सर्व बाजारपेठ समित्यांमध्ये कांदा खरेदीची मर्यादा लागू केली. यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संतापजनक वातावरण निर्माण झाले आहे. याचा परिणाम भाजप शिवसेनेच्या महायुतीला भोगावा लागेल. असा इशारा आमदार दिपीका चव्हाण यांनी केला आहे.

Similar News