सुप्रिया सुळेंच्या या व्हाट्सअप स्टेटसचा अर्थ काय?

Update: 2019-11-23 07:49 GMT

देशातील सर्वात मोठा राजकीय ड्रामा सुरु आहे. महाराष्ट्रात सत्ता स्थापन झाल्यानंतर आता मोठा राजकीय ट्वीस्ट पहायला मिळाला आहे. आज सकाळी अजित पवार यांनी भाजप सोबत जात उपमुख्यंत्री पदाची शपथ घेऊन सर्वाना धक्का दिला. यानंतर शरद पवार यांनी सुद्धा ट्विट करून अजित पवार यांचा भाजपला पाठिंबा हा त्यांचा वैयक्तिक निर्णय असल्याचे स्पष्ट केले आहे.

मात्र सुप्रिया सुळेंनी या घटनाबाबत कोणतंही ट्विट न करता त्यांनी आपल्या व्हॉट्सअॅप स्टेटसमध्ये याबाबत भाष्य केलं पहिल्या व्हॉट्सअॅप स्टेटसमध्ये पक्ष आणि कुटुंब फुटल्याचं सांगितलं. त्यानंतर काही वेळातच त्यांनी आपलं दुसरं स्टेटस देखील टाकलं. यात त्यांनी अजित पवारांच्या या निर्णयावर भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली. " आयुष्यात तुमच्यावर विश्वास कोण ठेवेल? माझ्या आयुष्यात कधीही इतकी फसवणूक झाल्याचं वाटलं नाही, पाठराखण केली, प्रेम दिलं त्याबदल्यात परत काय मिळालं?" असं व्हॉट्सअॅप स्टेटस पाहायला मिळालं.

Similar News