'आरश्यात स्वतःच्या नजरेला नजर देता येतेय का?' रुपाली चाकणकरांचा सवाल

Update: 2020-04-15 13:24 GMT

लॉकडाऊनमुळे उपासमारीची वेळ ओढावलेले हजारो मजूर मंगळवारी वांद्रे स्थानक (Mighrant at Bandra Station) पश्चिम परिसरात जमा झाले होते. विविध अफवांच्या माध्यामातून स्थलांतरीत मजूरांचा हा जमाव झाला होता. जमावातील काहींनी आक्रमक भुमिका घेतल्यानंतर पोलिसांना सौम्य स्वरुपाचा लाठीचार्ज करुन जमाव आटोक्यात आणावा लागला होता.

हे ही वाचा..

मंगळवारी एबीपी माझा (ABP Maza) वृत्तवाहीनीने दिलेल्या बातमीमुळे वांद्रे येथे स्थलांतरीत मजुरांचा जमाव झाला अशी टीकेची झोड सोशल मीडियावर उठली आहे. याप्रकरणी वांद्रे पोलिस ठाण्यात बातमीचं वृत्तांकन करणाऱ्या राहुल कुलकर्णी (Rahul Kulkarni) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. उस्मानाबाद पोलिसांनी पहाटे त्यांना ताब्यात घेऊन मुंबईला रवानगी केली आहे.

लॉकडाऊनमुळे अडकलेल्या मजूरांना त्यांच्या गावी नेण्यासाठी जनसाधारण स्पेशल ट्रेन्स सोडण्यात येणार असल्याचं वृत्त एबीपी माझानं काल सकाळी प्रसारित केलं होत. या वृत्ताचं वार्तांकन करणारे राहुल कुलकर्णी यांनी दक्षिण रेल्वेने काढलेल्या पत्राच्या आधारे वृत्त दिल्याचं म्हटलं आहे. त्यांच्या या स्पष्टीकरणावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी आक्षेप घेतला आहे. त्यांनी राहुल कुलकर्णी यांचं म्हणंण काही दाखल्यांसह खोडून काढले आहेत.

ABP माझाचे पत्रकार राहुल कुलकर्णी यांनी पोस्ट केली आहे. आपण आता फोटो बाय फोटो बघुयात.

 

Courtesy : Socail Media

फोटो क्रमांक 1 मध्ये राहुल कुलकर्णी यांनी त्यांची बाजू मांडली आहे. जाब विचारणाऱ्या लोकांना त्यांनी ट्रोल वगैरे म्हटलं आहे. तर ते असो. पुढं कुलकर्णी म्हणतात की, हे पत्र त्यांना रेल्वेतील एक अत्यंत जबाबदार अधिकाऱ्याने दिले. इथवर देखील पूर्ण मान्य आहे.

Courtesy : Social Media

पण पत्र दिल्यावर त्यावर काय लिहिलं आहे हे राहुल यांनी वाचलेले दिसत नाहीये.

कारण त्यांना मिळालेल्या पत्रावर तर वरती, 'South Central Railway' असा स्पष्ट उल्लेख असून पुढे सिकंदराबाद असं देखील ठसठशीतपणे लिहिलेले आहे.तिथं मुंबईचा प्रश्न नेमका येतो कुठून..? म्हणजे मुंबईचा काहीच संबंध नसताना, ती बातमी मुंबई संदर्भात आहे हे कशावरून ठरवले असेल बर यांनी..?

वरून राहुल असं देखील ठासून सांगतायत की, "अत्यंत जबाबदारीने. कुठेही कधी ट्रेन सुरू होणार हे सांगितले नाही." इतकं खतरनाक ठासून खोटं बोलायला जिगरा लागतो. राहुल यांच्याकडे तो मजबूत आहे, अस दिसतंय. याच उदाहरण आपल्याला तिसऱ्या फोटोत बघता येईल.

हा फोटो ABP माझा च्या वेब पोर्टल च्या त्या बातमीचा स्क्रिनशॉट आहे, ज्यामुळे सगळा गोंधळ उडाला. लॉकडाऊन चा फज्जा उडाला आणि हजारो निरपराध नागरिक आपला जीव धोक्यात घालून,गावी जायच्या आशेने रस्त्यावर उतरले.

काय आहे फोटोत त्या..? तर तिथं स्पष्टपणे महाराष्ट्रातून कोणत्या विभागातून रेल्वे धावणार..? मध्य रेल्वेच्या कोणत्या विभागातून रेल्वे धावणार..? दक्षिण मध्य रेल्वेच्या कोणत्या विभागातून रेल्वे धावणार..? याच स्टेशनच्या नावसाहित उल्लेख आहे.

आता माझा राहुल यांना प्रश्न आहे की, आपल्या म्हणण्याप्रमाणे जर,"अत्यंत जबाबदारीने. कुठेही कधी ट्रेन सुरू होणार हे सांगितले नाही." असं आपण म्हणताय... तर ही खालील स्टेशनच्या नावासाहित सर्व डिटेल्स नेमक्या कोणी टाकल्या..? या पूर्ण माहितीची नेमकी "सूत्रे" कोण आहेत.?

आणि त्याहून एक महत्वाचा प्रश्न,

"आज आरश्यात स्वतःच्या नजरेला नजर देता येतेय का..?"

Similar News