कॉग्रेस एनसीपीच्या जागा वाटपाचा अंतिम निर्णय घेण्यासाठी कॉग्रेसचे नेते दिल्लीत पोहचले आहेत. दोन्ही पक्षांना 125 जागा देण्यावर दोन्ही पक्षाची सहमती असून 38 जागा मित्र पक्षांना दिल्या जाणार आहेत. महत्वाचं म्हणजे काही जागांवर एनसीपीने आपला हक्क सांगितला असून त्यावर सोनिया गांधी यांची संमती घेतली जाणार आहे. पुणे येथील पुरंदरची जागा एऩसीपीकडे आहे पण त्या ठिकाणी कॉग्रेसने दावा ठोकला आहे, जुन्नरच्या जागेसाठी एनसीपी आग्रही आहे, कॉग्रसकडे असलेली राजूर ही जागाही राष्ट्रवादी कॉग्रेसला पाहिजे. एकून आठ ते दहा जागांबाबत वाद असून त्यावर आज किंवा उद्या तोडगा काढला जाईल असं सूत्रांनी सांगितलं.