आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमीत्त वर्षा बंगल्यावर अनेक मान्यवर शुभेच्छा देण्यासाठी पोहोचली. त्यात अमरावतीच्या खासदार नवनीत राणाही होत्या. मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाची भेट म्हणून नवनीत राणा यांनी आपला खासदारकीचा पहिला पगार मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये दिला. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी हा निधी वापरला जावा असे यावेळी त्यांनी सांगितले. यावेळी नवनीत यांच्यासोबत त्यांचे पती आमदार रवी राणा हे ही उपस्थित होते.