कंगना राणावतच्या कार्यालयाचा काही भाग अनधिकृत असल्याची नोटीस महानगरपालिकेकडून देण्यात आली होती. यावर आता खासदार नवनीत कौर राणा यांनी 'ही हुकुमशाही चांगली नाही' म्हटलं आहे. 'राज्य सरकार कंगनाचं ऑफिस तोडत आहेत. सत्तेच्या मोहात ताकदीचा असा गैरवापर केला जातोय. BMC शिवसेनेकडे आहे. ही हुकूमशाही चांगली नाही,' अशी प्रतिक्रीया दिली आहे.
एवढ्यावरच न थांबता नवनीत राणा यांनी कंगनाची बाजू घेत थेट शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्ती हा राज्याची जबाबदारी घेऊन चालतो. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांची एकतर पाठराखण करावी किंवा महिलांच्या बाजूने असाल तर त्यांचा राजीनामा घ्या, अशी मागणीच नवनीत राणा यांनी केली.