2019च्या लोकसभा निवडणुका अंतिम टप्प्यात आलं असून आज प्रचाराचा शेवटचा दिवस होता. मावळ मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारासाठी लोणावळा शहरात अजित पवार आणि नवनीत राणा कौर यांनी पदयात्रा काढली होती. अजित पवार अनुपस्थित राहिल्याने भर उन्हात नवनीत राणा कौर यांनी प्रचार केला. यावेळी त्यांनी पार्थ पवारांचे खासगी फोटो व्हायरल करणाऱ्यांवर टीका केली. कोणामध्ये किती दम आहे ते निवडणूक निकालानंतर दिसेल असाही टोला त्यांनी लगावला.
मावळ मतदार संघात युतीचे उमेदवार विद्यमान खासदार श्रीरंग बारणे आणि अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्यात काँटे की टक्कर पहायला मिळते आहे. ही निवडणूक पवार कुटुंबाच्या प्रतिष्ठेचे ठरणारी असल्याचं बोललं जात आहे.