केंद्र सरकार ने लॉकडाऊन 4 नंतर लॉकडाऊन 5 ची घोषणा केली आहे. लॉकडाऊन 4 ची मुदत 31 मे ला संपणार आहे. त्या अगोदर केंद्रीय गृहमंत्रालयांकडून दिशानिर्देश जारी करत लॉकडाऊन 5 ची घोषणा केली आहे. लॉकडाऊन 5 हा 30 जून पर्यत राहणार आहे. या नव्या गाईडलाईन्सला अनलॉक 1.0 असे नाव देण्यात आले आहे. यामध्ये आत्तापर्यंतचे नियम कमी करत बऱ्यापैकी शिथिलता देण्यात आली आहे.
नव्या गाईडलाईन्सनुसार देश लॉकडाऊन च्या बाहेर पडत असल्याचं एकंदरींत दिसून येतं. त्यामुळंचं या गाईडलाईन्सला अनलॉक 1 असं नाव देण्यात आलं आहे. अनलॉक 1 मध्ये प्रतिबंधित भाग सोडून इतर भागात प्रार्थना स्थळ, हाँटेल, रेस्टारंट सुरु होणार आहे. मात्र, मास्क लावणं बंधनकारक करण्यात आलं आहे. या विविध नियमाचं पालन करून पुढील गोष्टी सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
हा नियम कायम…
सार्वजनिक ठिकाणी, कामाच्या ठिकाणी आणि प्रवासादरम्यान तोंडावर मास्क किंवा कापड बांधणं बंधनकारक
कर्फ्यूचं काय?
रात्रीच्या कर्फ्यूची वेळ बदलली. आता रात्री 9 ते सकाळी 5 पर्यंत कर्फ्यू.
कंटेनमेंट झोन मध्ये काय?
लॉकडाऊन कंटेनमेंट झोन्समध्ये 30 जूनपर्यंत सुरू राहील. कंटेनमेंट झोनमध्ये केवळ अत्यावश्यक गोष्टींना परवानगी असेल. लोकांच्या आत-बाहेर येण्यावर बंदी असेल.
8 जून पासून प्रार्थना स्थळ सुरु होणार… तसंच या संदर्भात आरोग्य विभाग नियमावली जाहीर करणार
मंदिर, मशिदी आणि सर्व प्रार्थनास्थळं 8 जूनपासून उघडणार
रेड झोन बाहेरील हॉटेल, रेस्टॉरंट, शॉपिंग मॉल देखील 8 जूनपासून उघडणार आहेत. मात्र, या संदर्भात आरोग्य विभाग लवकरच काही नियम जाहीर करणार आहे.
शाळा कॉलेज कधी सुरु होणार?
राज्य सरकार शैक्षणिक संस्था आणि पालकांशी चर्चा करून केंद्राला माहिती कळवणार आहे. त्यानंतर शाळा, कॉलेज आणि शैक्षणिक संस्थांबद्दलचा निर्णय केंद्र सरकार जुलै 2020 ला जाहीर करणार आहे.
कटनेमेंट झोन्सच्या बाहेर बफर झोन्स आखण्याचा निर्णय राज्य सरकार घेणार आहेत. बफर झोन्समध्ये आवश्यक ते निर्बंध राज्य सरकार घालू शकतात.
सार्वजनिक ठिकाणी 6 फूट अंतर राखणं बंधनकारक
सार्वजनिक ठिकाणी 6 फूट अंतर ठेवणं बंधनकारक असून दुकानांमध्ये हे अंतर राखण्याची जबाबदारी दुकानदारांची असणार आहे. दुकानामध्ये एकाच वेळी 5 लोकांनाच दुकानात प्रवेश दिला जाणार आहे.
घरगूती कार्यक्रमाचं काय?
घरातील कोणत्याही कार्यक्रमात लग्न समारंभात केवळ 50 लोकांनाच बोलवता येणार आहे. तर अंत्यसंस्कारांसाठी केवळ 20 लोकांनाच परवानगी देण्यात येणार आहे.
सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यावर राज्य सरकार दंड आकारणार तसंच सार्वजिक ठिकाणी दारू, पान, गुटखा, तंबाखू खाण्यावर बंदी.
माणसांचं विकेंद्रीकरण
एका वेळी ऑफिसांत किंवा दुकानांत किंवा कारखान्यात गर्दी होऊ नये म्हणून तासांनुसार माणसांचं विकेंद्रीकरण करा.
राज्यांतर्गत वा राज्या-राज्यात सर्व दळणवळणावर बंदी नाही.
कसलीही परवानगी, मंजुरी व ई-परमिटची गरज नाही.