एनआरसी आणि नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरुद्ध या विद्यार्थ्यांनी नाकारलं मेडल
नागरिकत्व दुरुस्ती कायदा 2019 लागू झाल्यापासून देशभरात निदर्शनं सुरू झाली आहे. ईशान्य भारतानंतर राजधानी दिल्लीसह ठिकठिकाणी आंदोलक रस्त्यांवर उतरले आहेत. पॉन्डिचेरी विद्यालयातील गोल्ड मेडलिस्ट रबीहा अब्दुर्रहीम हिने नागरिकत्व दुरुस्ती कायद्यामुळे आपलं (Mass communication) मधलं पदक नाकारलं आहे. त्याचबरोबर रबीहाचं म्हणणं आहे की ज्यावेळी राष्ट्रपति रामनाथ कोविंद या दीक्षांत समारोहात आले तेव्हा रबीहाला कोणतंही कारण न सांगता तेथून जाण्यास सांगितलं, राष्ट्रपति गेल्यानंतर तिला आत बोलवण्यात आलं. या सर्व प्रकरणाची माहिती रबीहाने आपल्या फेसबुक पोस्ट लिहून शेअर केली आहे.
https://www.facebook.com/100003317673265/posts/2625970840856813/?d=n
"मी एक महिला एक विध्यार्थी आणि भारतीय या नात्यांनी माझा गोल्ड मेडल मी नाकारत आहे. मी हे यासाठी करत आहे की जी लोकं नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरुद्ध लढा देत आहेत. मी एक विद्यार्थी या नात्याने सर्वाना आवाहन करते की युवकांना शिक्षणाचा अर्थ मेडल आणि सर्टिफ़िकेट घेणं नाही. परंतु हे अन्यायाच्या, कट्टरतावादाच्या विरुद्ध उभे राहण्यासाठी आहे."
यावेळचा व्हिडिओ रबीहाने आपल्या फेसबूकवर पोस्ट केलं आहे.
https://youtu.be/g8dgpPVvlZI