जेव्हा सपना चौधरीही म्हणते " येणार तर मोदीच "

Update: 2019-05-17 08:33 GMT

हरयाणाची सुप्रसिध्द गायिका आणि डान्सर म्हंणून सपना चौधरी नावाजलेली आहे. मात्र तिने आता राजकीय भूमिका जाहीर करायला सुरवात केली आहे. काही दिवसांपूर्वी सपना चौधरी काँग्रेसमध्ये जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र त्याला पूर्णविराम देत ती भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू झाली.त्यानंतर तिने भाजप उमेदवार आणि अभिनेता मनोज तिवारी याच्या प्रसारात सहभाग घेतला . जेव्हा तिला लोकसभा निवडणुकीबाबत विचारलं असता मोदी बहुमताचे सरकार पुन्हा स्थापन करतील असं म्हटलं आहे.

दरम्यान काशी विश्वनाथाचे दर्शन घेऊन मोदी सरकार पुन्हा यावे अशी प्रार्थनाही केली दर्शन घेऊन बाहेर पडल्यानंतर पत्रकारांशी बोलताना तिने सांगितलं.. प्रियांका गांधी यांच्या प्रचाराबद्दल विचारणा केली असता सपना चौधरी म्हणाली की प्रियंका प्रचार करतायत, मात्र त्या किती यशस्वी होतील हे त्यांनाच माहीत. मोदी हे देशहितासाठी झटणारे नेते आहेत त्यामुळे त्यांना कोणीही पर्याय देशामध्ये नाही. राजकारणात त्यांच्या प्रवेशाबाबत प्रश्न विचारला असता तिने मी भाजपमध्येच जाईन असं सांगितले.

Similar News