महाराष्ट्रातील ओबीसी महिलांनी लिखाण करावं यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघ याची स्थापना करण्यात आली. ओबीसी लेखिकांनी नागपुरात २५ व २६ डिसेंबर रोजी पहिले फुले-शाहू-आंबेडकर ओबीसी महिला साहित्य संमेलनाचे आयोजन केले आहे. संमेलनाच्या संमेलनाध्यक्षपदाचा पहिला सन्मान प्रख्यात लेखिका प्रा. विजया मारोतकर यांना मिळाला. त्याचबरोबर या दोन दिवसीय ओबीसी महिला साहित्य संमेलनाचे आयोजन राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघाने केले असून संयोजक ज्येष्ठ पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्या संध्या राजूरकर आहेत. समन्वयक प्रा. माधुरी गायधनी आहेत.
यामध्ये ओबीसी महिला लिहत नाही भाषेबद्दल त्यांच्या मनात भीती असते. स्त्रियांच्या लिखाणावर जास्त करून पुरुषांचा प्रभाव असतो . त्याचबरोबर राजकारणातील स्त्रिया या पक्षीय भूमिका घेतात त्या स्त्रीवादी भूमिका घेताना दिसत नाही. असं मत लेखिका प्रज्वलता थट्टे यांनी व्यक्त केलं.
राष्ट्रीय ओबीसी महासंघकडून या महिलांना प्रेरणा देण्याचे काम या संस्थेमार्फत केलं जातं. या महिलांना एक प्लॅटफॉर्म मिळत नव्हता तो आता राष्ट्रीय ओबीसी महासंघ मार्फत मिळाला. या महिलांना लिहण्याचा वारसा नसतो. साहित्य ओबीसी महिलांचा तसा संबंध येत नाही मात्र आता राष्ट्रीय ओबीसी महासंघ मार्फत अशा महिलांना प्रेरणा मिळेल असं मत वकील समीक्षा यांनी केली.
युट्युबवर पाहण्यासाठी
https://youtu.be/voRoA9eISo4
फेसबुकवर पाहण्यासाठी