देशभरात प्रत्येक राजकीय पक्ष जोरदार प्रचार करत असून या रणांगणात महाराष्ट्राच्या मिसेस मुख्यमंत्रीही उतरल्या आहेत. ईशान्य मुंबईतून महायुतीचे उमेदवार मनोज कोटक यांचा प्रचार करण्यासाठी तसेच केंद्रातील भाजपा सरकारची कामं जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी मिसेस मुख्यमंत्री अमृता फडणवीस स्वतः प्रचाराच्या रणांगणात उतरल्या होत्या. या मतदारसंघात मनोज कोटक यांचा सामना महाआघाडीचे उमेदवार संजय दिना पाटील यांच्याशी होणार आहे.