हिंगणघाट, औरंगाबाद, मीरा रोड येथील घडलेल्या घटनांनी महिला सुरक्षितेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. औरंगाबाद येथे महिलेला जीवंत जाळल्याची घटना ताजी असताना माटुंगा रेल्वे स्टेशनवर एका विकृताने मुलीसोबत छेडछाड केल्याची घटना समोर आली आहे.
26 जानेवारी ला ही मुलगी माटुंगा स्टेशनच्या पुलावरुन जात होती. त्यावेळी या विकृताने तिला मागून येत धक्का दिला आणि तिच्याशी छेडछाड केली. असं या सीसीटीव्हीत दिसून येत आहे.
मुलीला तिच्यासोबत काय होत आहे. हे समजण्याच्या आतच या विकृताने तिथून पळ काढला. दरम्यान हतबल झालेली मुलगी या ठिकाणाहून निघून गेली. त्यानंतर पोलिसांनी या विकृताला ताब्यात घेतले आहे. राज्यात सध्या घडणाऱ्या घटनांचा विचार करता राज्यातील महिला सुरक्षित आहेत का? त्यांनी घराच्या बाहेर पडावे का? असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.