मुंबईतल्या चेंबूरमध्ये वाशी नाका येथे ट्रकची स्लॅबला धडक बसून तीन जण शौचालयाच्या टाकीत पडल्याची घटना घडली आहे. बुधवारी (3 एप्रिल) सकाळी ही घटना घडली. टाकीत एक व्यक्ती, मुस्लीम महिला आणि लहान मुलगा अडकला होता. या घटनेमुळे अऩेकांची तारांबळ उडाली असून अडकलेल्या तिघांनाही बाहेर काढण्यात यश आलं आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. याठिकाणी कोणतीही मोठी जीवितहानी झाली नाही. ही दुर्घटना म्हाडा कॉलनीच्या समोरील विनय इंग्लिश हायस्कूलजवळ शौचालयाची सेफ्टिक टँक खचल्यानं त्यावर उभा असलेल्या ट्रक त्यात फसला. आणि त्यात तीन जण अडकले होते.
बांधकामाला स्थानिकांचा विरोध
मात्र येथील रहिवाशांनी सुरु असलेल्या बांधकामाला वारंवार तीव्र विरोध करुनही हे प्रशासन येथील लोकांच्या जीवाशी खेळत असल्याचा आरोप येथील रहिवाशांनी केला आहे. आज ही तिसऱ्यांदा अशी घटना घडली आहे मात्र जर मोठी दुर्घटना झाली तर याला जबाबदार कोण असा सवाल महिला रहिवाशांनी केला आहे. नेमकं काय घडलं पाहुयात....
https://www.facebook.com/MaxMaharashtra/videos/770894973292794/