"त्या" वादग्रस्त विधानाचा मंत्री यशोमती ठाकूर यांनी केला खुलासा...

Update: 2020-01-13 08:50 GMT

महिला बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी याआधी एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं असल्यामुळे त्या चर्चेत होत्या. याआधी त्यांनी वाशिम इथे जिल्हा परिषद निवडणूक प्रचार दरम्यान, 'मतदारांना निवडणुकीत उमेदवार पैसे देत असेल तर घ्या. मात्र, मत कॉंग्रेस लाच द्या. विरोधक नुकतेच सत्तेतून गेल्याने त्यांचे खिसे गरम आहेत', असं वक्तव्य केलं होतं.मात्र त्यांच्या अजून एका विधानामुळे त्या पुन्हा चर्चेत आल्या आहेत. 'आपल्यामधील जे नकारात्मक विचार आहे ते गाईच्या दर्शनामुळे, गायीच्या पाठीवरून हात फिरविल्याने हे सगळे विसरून जातो आणि हा चमत्कार आहे, असे वक्तव्य महिला बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी केले. त्यांच्या तिवसा मतदार संघातील रविवारी आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावर त्यांनी आपल्या वक्तव्याचा खुलासा करत

"माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला असून गायीचे दर्शन घेणे परंपरा आहे आणि गाईला हात लावल्याने सर्वानाच चांगलं वाटतं यामध्ये अंधश्रद्धा असल्यासारखे काही नाही मी काँग्रेसची आहे मी हिंदू धर्माची आहे मी सर्व धर्माना मानणारी आहे.मी दर्ग्यात जाऊन पण प्रार्थना करते त्यामुळे मला ट्रोल का केलं जातंय हे मला पण समजत नाही याचा खेद वाटतो. "

असं महिला बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर म्हणाल्या.

https://youtu.be/OD0ZHzY9VZY

 

 

 

 

 

Similar News