आई गेली, पण गर्दी टाळली

Update: 2020-03-27 14:27 GMT

परवा रात्री 11.30 वाजता आमची मम्मी आम्हाला सोडून गेली.बरेच वर्षे आजारी होती.तिला interstitial lung disease हा फुफ्फुसांचा आजार होता.गेले वर्षभर bedridden होती,24 तास प्रेशरने ऑक्सीजन द्यायला लागायचं.माझ्याकडेच होती.15-20 गोळ्या रोजच्या खाव्या लागायच्या.

गेल्या वर्षभरात तिला अनेकदा अचानक respiratory failure व्हायचे.पूर्ण शरीर काळे निळे पडायचे.इंजेक्शने,सलाईन देऊन तिला त्यातून बाहेर काढायचो. पण परवा रात्री बाहेर नाही येऊ शकली.

तिने आयुष्यभर अत्यंत कष्ट करून आम्हा भावंडाना शिकवले,चांगले संस्कार दिले.तिची सर्व कर्तव्ये तिने पार पडली,आमची परतफेड करण्याची वेळ आली तेंव्हा या दुर्मिळ आजाराने तिला ग्रासलं. अजून खूप काही तिच्यासाठी करायचं होतं ही खंत मनात नेहमी राहील.

ती गेल्याने पोरकं झाल्याची भावना आहे.

तिच्या आजारपणात आमच्या वडीलांनी तिची रात्रंदिवस सेवा केली. सर्व भावंडे,तिचे जावई,इतर सर्वच नातेवाईक सर्वांनी खूप खूप काळजी घेतली आणि मदत केली.

डॉ वीणा पुरंदरे,डॉ अमन खोजा ,डॉ साहेबराव टोके,डॉ विजय जाधव,डॉ कविता जाधव ,डॉ पृथ्वीराज पाटील या डॉक्टरांनी तिचा आजार सुसह्य व्हावा म्हणून खूप चांगले उपचार केले.

या सर्वांची मी आयुष्यभर ऋणी राहीन.

कोरोनामुळे तिच्या अंत्यदर्शनाला आणि इतर विधींच्या वेळी गर्दी होऊ नये याची काळजी आम्ही घेतली.

गेल्या दोन दिवसात असंख्य लोकांनी फोन करून,सोशल मीडियामधून ,प्रत्यक्ष भेटून आधार दिला .

🙏सर्वांचे आभार🙏. डॉ साधना पवार

Similar News