नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी जगात आले 'एवढे' नवे पाहुणे; भारतात सर्वाधिक बालकांचा जन्म
लोकसंख्येत दुसऱ्या स्थानावर असलेल्या भारताने चीनला मागे टाकत नव्या वर्षी एक विक्रम आपल्या नावे केला आहे. एक जानेवारी 2020 रोजी देशात तब्बल 67 हजार 385 बाळांनी जन्म घेतला. ही संख्या जगभरात सर्वाधिक आहे . लोकसंख्येत पहिल्या स्थानी असलेला चीन मात्र दुसऱ्या स्थानी आहे.१ जानेवारी या दिवशी चीनमध्ये ४६, २२९ बालकांनी जन्म घेतला, तर नायजेरियात २६, ०३९ बालकांनी, पाकिस्तानात १३, ०२० बालकांनी, तर इंडोनेशियात १३,०२० बालकांनी जन्म घेतला. अमेरिकेत या दिवशी १०,४५२ बालकांनी जन्म घेतला. ही आकडेवारी लक्षात घेतली असता भारतात जन्माला आलेल्या बालकांची संख्या १७ टक्के इतकी आहे. त्याचबरोबर २०२० मध्ये पहिल्या बाळाचा जन्म फिजी देशात झाला. तर जन्मलेलं शेवटचं बाळ अमेरिकेतील होतं. सदर आकडेवारी युनीसेफने प्रसिद्ध केली आहे.