धारावीत कोरोना चाचणीसाठी आता मोबाईल व्हॅन फिरणार

Update: 2020-05-28 07:58 GMT

मुंबईच्या धारावी (Dharavi Corona Virus) भागात कोरोना रुग्णांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. धारावीच्या या वस्त्य़ांमध्ये लोकसंख्येचं प्रमाण जास्त आहे. फिजीकल डिस्टंसींगच्या नियमांचं पालन करणं या भागात फारच कठीण आहे. सोबतच स्वच्छतेचा अभावही मोठ्या प्रमाणात असल्यामुळे या भागात कोरोनाचा फैलाव जास्त झालाय.

हे ही वाचा...

आरोग्या यंत्रणा आणि शासन व्यवस्था या क्षेत्रात कोरोनावर मात करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहे. सोबतच धारावी मतदारसंघाच्या आमदार आणि राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) कोरोनाच्या या लढाईत सातत्याने सक्रीय आहेत.

नुकतंच धारावीत आयुष डॉक्टर्स असोसीएशनच्या वतीने केलेल्या कोरोना चाचणीसाठी मोबाईल व्हॅनच्या उद्घघाटन प्रसंगी त्या उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी संस्थेतील डॉक्टरांचे आभार मानले. मोबाईव व्हॅनच्या मदतीने कोरोनाच्या चाचणी अधिक गतीने करता येईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

Similar News