धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात अपक्ष विजयी उमेदवार मंजुळा गावित यांनी शिवसेनेला पाठिंबा दर्शवला आहे. त्याबाबतचे पत्रही गावित यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे दिले आहे.
विधानसभा निवडणूका नुकत्याच पार पडल्या आणि सत्ता स्थापनेवरून महायुतीचं राजकारण चांगलच तापलंय. मुख्यमंत्री पदावरून शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये चढाओढ सुरू झाली आहे.
महायुतीचे सरकार होणार हे जरी स्पष्ट असले तरी, भाजप आणि शिवसेना अपक्ष उमेदवारांना सोबत घेऊन आपले संख्याबळ वाढवत आहेत. आत्तापर्यंत शिवसेनेला पाच अपक्ष उमेदवारांनी पाठींबा दर्शवला आहे आणि मंजुळा गावित या सहाव्या अपक्ष उमेदवार आहेत.
साक्री तालुक्यात भाजपने मंजुळा गावित यांच्याऐवजी मोहन सुर्यवंशी यांना उमेदवारी दिली होती. यामुळे बंडखोरी करत गावित यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली आणि अधिकाधिक मतं मिळवून विजयी झाल्या आहेत.