सध्या कामगारांनी त्यांच्या घरी जाण्यासाठी असणाऱ्या प्रवासी रेल्वे गाड्या, तसंच बसेस बंद आहेत. कोरोना व्हायरस मुळे जवळ जवळ दीड महिन्यांपासून ते राज्यातील विविध ठिकाणी अडकले आहेत. शुक्रवार दिनांक 7 मेला रात्री औरंगाबाद येथील काही कामगार रेल्वे पकडण्यासाठी गावाकडे निघाले होते.
मात्र, यातील 1४ कामगार माल गाडी खाली आल्यानं त्यांचा मत्यू झाला आहे. बदनापूर ते करमाडदरम्यान हा अपघात झाला आहे. हे सर्व कामगार जालना येथे एका स्टील कंपनीत काम करत होते.
हे कामगार रात्री रेल्वे रुळावर झोपले असल्याचं समजतंय. यातील काही गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. देशात लॉकडाऊन असल्यामुळे प्रवासी रेल्वेसेवा बंद आहे.
त्यामुळं प्रवासानं थकलेल्या या कामगारांनी बदनापूर ते करमाडच्या दरम्यान रात्री सटाणा शिवाराजवळ रेल्वे रुळावरच झोपले. मात्र, जालन्याहून औरंगाबादकडे आलेल्या मालगाडी चा त्यांना अंदाज न आल्यानं मालगाडी खाली चिरडून त्यांचा मृत्यू झाला आहे.