दिल्लीतील शिक्षिकेच्या ट्वीटवर फर्स्ट लेडी मेलानिया यांचं उत्तर

Update: 2020-02-29 08:52 GMT

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) आणि फर्स्ट लेडी मेलानिया (Melania Trump) ट्रम्प २ दिवसांच्या भारत दौऱ्याहून भारतात परतले आहेत. दोघांनीही परतल्यानंतर भारतीय पाहुणचाराबद्दल आभार व्यक्त केले आहेत. ‘व्हाईट हाऊस’च्या अधिकृत ट्वीटर हॅंडलवरुन ट्रम्प कुटुंबाच्या भारतभेटीचा व्हिडीओही पोस्ट केला होता. मेलानिया यांनी दिल्लीच्या शाळेतील शिक्षिका मनु गुलाठी (Manu Gulathi) यांचेही आभार मानले आहेत.

भारत दौऱ्यात मेलानिया यांनी दिल्लीतील एका शासकीय शाळेतील हॅप्पीनेस क्लासला भेट दिली होती. या भेटीतील काही क्षणांचे फोटो शाळेच्या शिक्षिका मनु गुलाठी या शिक्षिकेने आपल्या ट्वीटर हॅंडलवर पोस्ट केले आहेत. त्यांनी आपल्या वर्गातील मुलांचा पोटो शेअर करुन मेलानिया यांचे आभार मानले आहेत. तुम्ही स्वगृही परतल्या आहात तरीही आमच्या शाळेतील मुलांचा उत्साह अजूनही कायम असल्याचं म्हटलं. यावर मेलानिया यांनीही आनंद व्यक्त केला आहे.

Similar News