कल्याण-डोंबिवलीच्या महापौर विनिता राणे यांनी परिचारिका बनून रुग्णसेवेची इच्छा व्यक्त केली आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या सर्व परिस्थितीचा ताण पालिकेच्या वैद्यकीय सेवेवर होत आहे. हे बघून अस्वस्थ वाटत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
हे ही वाचा | माणुसकी तोकडी पडतेय का?- आरती आमटे
विनिता राणे या नर्सिंग डिप्लोमाधारक असून महापौर बनण्याआधी मुंबईतील नायर हॉस्पिटलमध्ये सुमारे 32 वर्षे त्यांनी रुग्णसेवा केली आहे. या सेवेचा फायदा कल्याण डोंबिवलीतील नागरिकांना व्हावा म्हणुन पालिकेच्या रुग्णालयात परिचारिका म्हणून रुग्णांची सेवा करण्याची इच्छा मनपा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे केली असल्याचं त्यांनी सांगितलं.
हे ही वाचा | Fact Check | व्हॉट्सअपमध्ये तिन्ही टिक √√√ लाल झाल्या तर तुमच्यासाठी धोक्याची घंटा? वाचा ‘Red Tick√’ चं सत्य