MaxWoman Impact: अभिनेत्री मेघा घाडगेच्या फोटोवर अश्लील कॉमेंट प्रकरणाची अधिवेशनात दखल

Update: 2020-03-05 14:49 GMT

प्रसिद्ध लावणी कलाकार आणि अभिनेत्री मेघा घाडगे यांच्या फेसबुक फोटोवर कॉमेंट करणाऱ्या सरुप पांडा नामक अज्ञात व्यक्तीचा तपास तातडीने सुरु करण्यात आला आहे. मागील आठवड्यात मेघा घाडगे यांनी आपल्या फेसबुक अकांऊटवर ‘परतू’ चित्रपटातील सहकलाकारसोबतचा फोटो पोस्ट केला होता. त्या फोटोवर सरुप पांडा नावाच्या फेसबुक अकाऊंचा वापरणाऱ्या व्यक्तीने अश्लील कॉमेंट केल्या होत्या.

यासंबंधित तक्रार दाखल करताना पोलिसांकडूनही दिरंगाई करण्यात आल्याचा आरोप त्य़ांनी केला होता. या प्रकरणात ‘मॅक्सवुमन’ने ‘अभिनेत्री मेघाच्या ‘या’ फोटोवर माथेफिरूच्या अश्लील कॉमेंट्स’ या आशयाचं वृत्त प्रकाशीत केलं होत. या बातमीची दखल घेत भाजप आमदार चित्रा वाघ यांनी या घटनेचा निषेध व्यक्त करत माजी महसूलमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सदर प्रकरण सभागृहाच्या पटलावर मांडणार असल्याचं स्पष्ट केलं होत.

सुधीर मुनगंटीवार यांनी या प्रश्नावर स्थगन प्रस्ताव मांडून महिला सुरक्षेचा ज्वलंत प्रश्न उपस्थित केल्याबद्दल आभार मानले. चित्रा वाघ यांनी "धन्यवाद सुधीरभाऊ, अभिनेत्री मेघा घाडगेंच्या FB फोटोवर माथेफिरूने अश्लील भाषेत कमेंट केल्याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यासाठी गेल्यावर पोलिसांनी दिरंगाई केली राज्यातील महिलांच्या या ज्वलंत प्रश्नावर स्थगन प्रस्ताव मांडून अधिवेशनात दखल घेतल्याबाबत.. असे ट्वीट केले आहे."

 

Similar News