महिलांच्या न्यायासाठी आता "महिला आयोग आपल्या दारी"

Update: 2019-06-11 12:08 GMT

महिलांच्या सुरक्षेबाबतचा प्रश्न ऐरणीवर असताना महाराष्ट्र राज्य महिला आयोगातर्फे महिलांच्या सुरक्षेसाठी पाऊल उचलत "महिला आयोग आपल्या दारी" हा उपक्रम हाती घेतला आहे. मंगळवारी (ता११) औरंगाबाद जिल्यात हा उपक्रम राबवण्यात आला असून या आयोगाद्वारे महिलांच्या प्रश्नांवर सुनावणी केली जाणार आहे. अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी दिली . महिलांना त्यांच्या जिल्यांमध्ये न्याय मिळावा या हेतूने "महिला आयोग आपल्या दारी" हा उप्रकम राबवण्यात आला आहे.

ग्रामीण भागातील स्त्रियांना शहरी भागात येऊन तक्रार करणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नसून प्रत्यक्ष

उपस्थित राहणे सोईस्कर नसल्याने अश्या महिलांना याचा फायदा होणार आहे. त्यामुळे अश्या न्यायापासून दुरावलेल्या महिलांना या उपक्रमातून दाद मागता येईल. दरम्यान या बैठकीस जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी , पोलीस अधीक्षक , पोलीस आयुक्त , महानगर पालिका आयुक्त उपस्थित होते.

Similar News