मराठी आयपीएस अधिकारी करणार हैदराबाद एन्काऊंटरची चौकशी

Update: 2019-12-09 10:41 GMT

हैदराबाद येथील बलात्कार आरोपींच्या एन्काऊंटरवर (Hyderabad Encounter) प्रश्न उपस्थित केल्यानंतर तेलंगणा सरकारने या प्रकरणी ८ सदस्यांच्या विशेष तपास पथकाची (SIT) नेमणूक केली आहे. या टीमचं नेतृत्व महेश भागवत या एका मराठी आयपीएस अधिकाऱ्याकडे असणार आहे.

भागवत मुळचे अहमदनगर येथील पाथर्डी तालुक्यातील आहेत. ते सध्या रच्चाकोंडाचे पोलीस आयुक्त म्हणून काम करत आहेत.

हैदराबाद एन्काऊंटरविरोधात न्यायालयात याचिका दाखल झाली आहे. मानव हक्क आयोगाने देखील या प्रकरणी दाखल घेतली. त्यानंतर तेलंगणा राज्य सरकारनेही अखेर एसआयटीची नेमणूक करत एन्काऊंटरच्या चौकशीचे आदेश दिले.

Similar News