झवायला देतास का नाही रे, झवायला देतेस का?

Update: 2019-06-15 18:53 GMT

समाज माध्यमात यावत्यांव कारणांवरून महिलांना वाह्यात भाषेत ट्रोल करणाऱ्या सर्वप्रकारच्या म्हणजे, जातीय, धार्मिक, प्रांतीय, भाषिक कट्टरतावाद्यांना केतकी चितळेचं हे प्रातिनिधिक उत्तर आहे, नव्हे एक सणसणीत चपराक आहे...

Full View

काय नक्की प्रकरण?

मध्यंतरी केतकीने आपल्याला फॉलो करणारे मराठी बरोबरच हिंदी, इंग्रजी भाषेतील असल्यामुळे आपण यापुढे हिंदीत व्हिडीओ करणार असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर तिला सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर करत तुला मराठीची लाज वाटत असल्याची टीका करून तिला ट्रोल केले आहे. त्यानंतर केतकीने या ट्रोल्सना त्यांच्याच भाषेत उत्तर दिलं आहे.

केतकी ने अशा पद्धतीने अश्लील भाषेत बोलणारा महाराष्ट्र माझा नाहीय अशा शब्दांत तिच्यावर करण्यात आलेल्या टीकेचा समाचार घेतला आहे. मराठी अस्मितेच्या नावावर केतकीला अश्लील भाषेत ट्रोल करणाऱ्याांचा मॅक्सवुमन/मॅक्समहाराष्ट्र तीव्र शब्दांत निषेध करत आहे. तुम्हाला ही असे अनुभव आले असतील तर तुम्ही आमच्याशी शेअर करा. अशा ट्रोल गँग ना उघडं पाडण्यासाठी तुम्हीही पुढे या.

Full View

Similar News