ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे निधन

Update: 2020-09-22 08:22 GMT

ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे आज पहाटे कोरोनाच्या संसर्गामुळे निधन झालं आहे. सातारा येथील फलटण तालुक्यात 'माझी आई काळूबाई' या मालिकेच्या शुटिंग दरम्यान त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली होती. साताऱ्यातील प्रतिभा हॉस्टिटलमध्ये कोविड अतिदक्षता विभागात पाच दिवसांपासून त्या व्हेंटिलिटरवर होत्या. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली.

जवळपास 40 हून अधिक वर्षांपासून त्या रंगभूमी, सिनेमा आणि मालिकांमधून काम करत होत्या.गुंतता हृदय हे, रायगडाला जेव्हा जाग येते, चिन्ना आणि महानंदा यामध्ये त्यांनी प्रमुख भूमिका साकारल्या. संगीत नाटक मत्स्यगंधाच्या माध्यमातून त्यांनी आपल्या नाटकातील कारर्कीदीस सुरुवात केली.

तर बासू चटर्जी यांच्या अपने पराये या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. मराठी चित्रपट सृष्टीत उंबरठा, सूत्रधार, नवरी मिळे नवऱ्याला, वहिनीची माया, माहेरची साडी हे त्यांचे गाजलेले चित्रपट होते.

Similar News