राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आला आहे. याच मुद्द्यावर लोकसभेत खासदार सुप्रिया सुळे यांनी सर्वांचे लक्ष वेधले. “मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने महाराष्ट्रात मराठा तरुण-तरुणींमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. देशात आजवर अशा प्रकारे आरक्षणाला स्थगिती देण्याची ही पहिलीच घटना आहे. तामिळनाडूतील आरक्षणाचे प्रकरण न्यायालयात आले पण आरक्षणाला स्थगिती आदेश दिला नाही. त्यामुळे याबाबत पंतप्रधानांनी मार्गदर्शन करावे.” असं सुळे यांनी म्हटंल आहे.
“या स्थगितीमुळे मराठा समाजाचे शिक्षण, नोकऱ्या आदी सर्वच आघाड्यांवरील प्रश्न अडकून राहिले आहेत. ही वस्तुस्थिती आहे.” असं देखील सुप्रिया सुळे यांनी आपल्या लोकसभेतील भाषणात म्हटलं आहे.