2019 च्या लोकसभा निवडणुकीत मेनका गांधीनी यूपीच्या सुल्तानपुर मध्ये मजबूत दावेदारी केलीय. विशेष म्हणजे गेल्या दोन दशकांपासून त्या एकही निवडणूक पराभूत झाल्या नाहीत. त्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधींच्या सुन आणि बहुगुणी काँग्रेस नेते संजय गांधी यांच्या पत्नी आहेत. त्या प्राण्यांना फार जीव लावतात आणि त्या नेहमीच त्यांच्या अधिकारासाठी लढत असतात. त्यांनी अनेक पुस्तकेही लिहली आहेत. मेनका गांधी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांपैकी एक मानल्या जातात.
पती संजय गांधी यांचे निधन झाल्यानंतर त्यांचे सासू इंदिरा गांधी यांच्याशी फार चांगले संबंध राहिले नाहीत म्हणून त्या काँग्रेसपासून दुरावल्या. नंतर त्यांनी राष्ट्रीय सजंय मंच तयार केला, या मंचावर सुरुवातीस तरूणांबद्दल जागरूकता आणि रोजगाराची समस्यां संदर्भातील मुद्दे उचलून धरले. आंध्र प्रदेशमध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये या मंचाने 5 पैकी 4 जागा जिंकल्या होत्या. मेनका गांधी यांनी 'द कंप्लीट बुक ऑफ मुस्लिम अँड पार्सी नेम्स' हे पुस्तक प्रकाशित केले कारण त्यांचे पती संजय गांधी यांचा पारसी धर्मावर खूप विश्वास होता. नंतर त्यांनी 'द बुक ऑफ हिंदू नेम्स' हे पुस्तकही प्रकाशित केले.
मेनका गांधींचा जीवनकाळ
मेनका आनंद यांचा जन्म 26 ऑगस्ट 1956 रोजी नवीन दिल्लीत एका शीख परिवारात झाला असून त्यांचे वडील सैन्यात अधिकारी होते. त्यांचे शिक्षण सेंट लॉरेन्स स्कूल आणि लेडी श्रीराम कॉलेज फॉर वूमेन मधून झाले. त्यांनी जेएनयू दिल्ली मधून जर्मन भाषेचे देखील शिक्षण घेतले. एका कार्यक्रमादरम्यान त्यांची मुलाखत संजय गांधींसोबत झाली आणि मग दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. मेनका यांनी अनेकदा संजय गांधींसोबत निवडणूक प्रचारातही सहभाग घेवून त्यांना भरपूर मदत करत असत. त्या काळात संजय गांधी खूप प्रभावी होते आणि त्यांचा आई आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधींच्या निर्णयांमध्ये प्रत्यक्ष हस्तक्षेप असे.
दरम्यानच्या काळात मेनका गांधींनी सुर्या नावाच्या एका मासिकाची सुरुवात केली होती. 1977 च्या निवडणुकीत काँग्रेसच्या पराभवानंतर या मासिकाच्या प्रसाराची जबाबदारी उचलली. 1980 मध्ये त्यांना एक मुलगा झाला, त्याचं नाव दादा फिरोजजींच्या नावावरुन ठेवण्यात आले. नंतर इंदिरा गांधींनी त्यांच्या नावा पुढे वरुण जोडले. मेनका 23 वर्षांच्या आणि वरुण केवळ 3 महिन्यांचा असताना संजय गांधीचा एका हवाई अपघातात मृत्यू झाला.