"बंगाल में रेहना होगा तो बंगाली बोलना पडेगा!"

Update: 2019-06-14 11:05 GMT

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी 'बंगाल में रेहना होगा तो बंगाली बोलना होगा', असा भाषिक राग आळवला आहे. विकास आम्ही सातत्याने करतो आहे. मी जेव्हा बिहारला जाते, उत्तर प्रदेशात किंवा पंजाबला जाते तेव्हा तिथली भाषा बोलते. जर तुम्ही बंगालमध्ये येणार असाल तर तुम्हाला बंगाली भाषा आलीच पाहिजे असं ममता यांनी म्हटलं आहे. इतकेच नाही तर बंगालमध्ये येऊन राहणाऱ्या आणि बाईकवरून फिरणाऱ्या गुंडांची गुंडगिरी मी सहन करणार नाही, असाही इशारा त्यांनी दिला आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी ममता बॅनर्जी पश्चिम बंगालचा दौरा करत होत्या तेव्हा काहींनी जय श्रीरामचे नारे दिले होते. त्यावेळी त्या कारमधून खाली उतरल्या आणि घोषणा देणाऱ्यांना कारवाईचा इशारा दिला होता. लोकसभा निवडणुकीत भाजपाने पश्चिम बंगालमधून १५ पेक्षा जास्त जागा मिळवल्या आहेत. काही दिवसांपूर्वी भाजपाने बाईक रॅलीही काढली होती. शुक्रवारी या सगळ्याला ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या आक्रमक भाषेत उत्तर दिले आहे.

Similar News