पश्चिम बंगाल राज्याच्या विद्यमान मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी यांनी सोनिया गांधी यांनी १३ जानेवारीला बोलावलेल्या बैठकीवर आपण बहिष्कार घालणार असल्याचीही घोषणा केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा विरोधी पक्षांमधील फूट उघड झाली आहे. विद्यापीठांमधील हिंसाचार आणि सुधारित नागरिकत्व कायदा या मुद्दय़ांवर "वेळ आली तर एकटी लढेन' असं आवाहन करत या बैठकीवर बहिष्कार टाकल्याची घोषणा त्यांनी केली आहे. गुरुवारी राज्य विधानसभेत झालेल्या चर्चेत सोनियांच्या बैठकीला जाणार नसल्याचे जाहीर केले आहे.